लक्ष्मणच्या पार्टीला धोणीला आमंत्रण नाही

August 22, 2012 2:44 PM0 commentsViews: 3

22 ऑगस्ट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर व्ही व्ही एस लक्ष्मणने मंगळवारी रात्री भारतीय क्रिकेटपटूंसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. पण या पार्टीला भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीला मात्र आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. याबाबत आज पत्रकार परिषदेत धोणीला विचारला असता त्यानं आपल्याला आमंत्रण मिळालं नसल्याचं सांगितलं. या पार्टीला सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि झहीर खानला आमंत्रण होतं. न्यूझीलंडविरुध्द दोन टेस्ट मॅचसाठी लक्ष्मणची भारतीय टीममध्ये निवड झाल्यानंतरही त्यानं अचानक निवृत्ती जाहीर केली. या निवृत्तीमागे धोणीला जबाबदार धरण्यात येतंय.

close