न्यूझीलंडविरुध्दच्या टेस्टसाठी भारतीय टीम सज्ज

August 22, 2012 2:56 PM0 commentsViews: 5

22 ऑगस्ट

भारतीय क्रिकेट टीमच्या नव्या हंगामाला आता हैदराबाद टेस्ट मॅचपासून सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअवर उद्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होईल. नव्या हंगामाबरोबरच भारतीय क्रिकेट टीमच्या नव्या अध्यायालाही सुरुवात होईल. कारण राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या दिग्गज बॅटसममनच्या गैरहजेरीत भारताची युवा टीम मैदानात उतरेल आहे. द्रविड आणि लक्ष्मणची उणीव नक्कीच जाणवेल पण युवा खेळाडूंसाठी ही एक चांगली संधी असल्याचं कॅप्टन धोणीनं म्हटलं आहे. दुसरीकडे, या सीरिजमध्ये द्रविड आणि लक्ष्मणचा मुकाबला करायला लागणार नसल्यामुळे न्यूझीलंड टीम आनंदात आहे. पण तरीही त्यांच्यासाठी हे आव्हान सोपं नाही. टेस्ट रँकिंगमध्ये न्यूझीलंड आठव्या क्रमांकावर आहे आणि नुकताच विंडीजकडून झालेल्या 2-0 अशा पराभवातून ते सावरत आहे.

भारताची टेस्ट टीम

एम एस धोणी, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर,एस बद्रीनाथ, गौतम गंभीर, विराट कोहली, चेतेश्वर पूजारा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, उमेश यादव आर अश्विन, पियुष चावला, झहीर खान, प्रग्यान ओझा आणि ईशांत शर्मा

close