ठाणे पालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी हणुमंत जगदाळे

August 22, 2012 3:17 PM0 commentsViews: 7

22 ऑगस्ट

ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हणुमंत जगदाळे यांची पुन्हा एकदा ठाण्याचे महापौर हरीश्चंद्र पाटील यांनी नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विरोधी पक्षनेते पदावरून वाद सुरू होता. याआधी महापौरांनी ठाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांची नियुक्ती केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी न्यायलयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायलयाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या सदस्याचे पालिकेतील विरोधातील अधिक संख्याबळ असेल त्याला म्हणजे लोकशाही आघाडीच्या गटनेत्याला महापौरांनी विरोधी पक्षनेते पद द्यावं असं सांगितलं होतं. त्यानंतर महापौरांनी जगदाळे यांची नियुक्ती केली आहे.

close