राज ठाकरेंविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

August 22, 2012 4:37 PM0 commentsViews: 9

22 ऑगस्ट

काल मंगळवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंदू मिलबाबत केल्या विधानामुळे आणखी अडचणीत आले आहे. आज त्यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऍड. कनिष्क जयंत यांनी तक्रार दाखल केली. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणातल्या इंदू मिलबाबतच्या टीकेला त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच राज यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, आरपीआय कार्यकर्त्यांनी आज मुंबईसह,औरंगाबाद,नाशिक येथे राज ठाकरेंविरोधात निदर्शनं केली. औरंगाबादमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांनी राज ठाकरे याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी सिडको चौकात घोषणा देत रास्ता रोको आंदोलनही केलंय.काय म्हणाले होते राज ठाकरे ?

मुंबईपाठोपाठ उत्तरप्रदेशमध्ये हिंसक जमावाचा मोर्चा निघाला. त्याही जमावाने तोडफोड केली धिंगाणा घातला. यात भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची तोडफोड केली. आता कुठे गेल्या मायावती, कुठे गेले रामदास आठवले, कुठे गेले रा.सु.गवई, कुठे गेले प्रकाश आंबेडकर ? सगळे चिडीचुप.. नुसतं इंदू मिल..इंदू मिल..काय तिथे बंगला बांधायचा आहे का ? अशी टीका राज यांनी केली होती.

रिपाईच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला

close