लायसन्स नव्हते म्हणून पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण

August 22, 2012 10:27 AM0 commentsViews: 6

22 ऑगस्ट

पोलिसांच्या कामात अडथळा घातल्यामुळे एका युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोलापूर जिल्हातील बार्शीमध्ये समोर आली आहे. या युवकावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. रमेश देशमाने या युवकाकडे पोलिसांनी लायसन्सची मागणी केली. लायसन्स नसल्याच सांगितल्यानंतर, युवक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी या युवकाला पोलीस स्टेशनमध्ये आणून मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी मात्र मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. अलीकडे सीएसटी परिसरात हिंसाचारात मुंबई पोलिसांना मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर गृहखात्यावर चौफेर टीका होत आहे आणि दुसरी अशा प्रकारच्या घटना घडत आहे.

close