यावर्षीपासून ‘नीट’ परीक्षा आता राज्यात होणार

August 23, 2012 10:43 AM0 commentsViews: 105

23 ऑगस्ट

मेडिकलसाठी प्रवेश घेऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात यावर्षीपासून मेडिकलसाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा होणार आहे. राज्यात मे 2013 मध्ये नॅशनल इलिजिबिलीटी एन्स्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET 'नीट' परीक्षा होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हे आता निश्चित झालंय. गेल्यावर्षी नीटची परीक्षा होणार होती, मात्र काही पालकांनी अभ्यासक्रमाच्या वादावरुन कोर्टात केलेल्या याचिकेनंतर ही परीक्षा गेल्यावर्षीसाठी स्थगित करण्यात आली होती. मेडिकलसाठी राष्ट्रीय परीक्षा झाली तरी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असं डीएमईआर (DMER)ने स्पष्ट केलंय. राज्यात मेडिकलच्या 15 टक्के जागा केंद्रीय कोटा म्हणून राखीव आहेत. हा कोटा कायम राहणार आहे. एमबीबीएस आणि डेंटलचे प्रवेश नीटच्या माध्यामातून होणार मात्र आयुर्वेदिक, होमियोपॅथी युनानी यांचे प्रवेश नीटच्या माध्यमातून करायचे की नाही याचा निर्णय व्हायचा आहे.

close