बँक कर्मचारी दोन दिवस संपावर

August 22, 2012 11:23 AM0 commentsViews: 4

22 ऑगस्ट

सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियनने 2 दिवसाच्या संपाची हाक दिली आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि ऑउटसोर्सिंग पॉलिसीला कामगार संघटनांचा विरोध आहे. सार्वजनिक बँक युनियनची पालक संघटना, युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनचे सर्व पदाधिकारी या संपात सहभागी झाले आहे. मात्र संपामुळे बँक बंद असल्यातरी एटीम मात्र सुरू आहेत. सार्वजनिक बँकेच्या 87000 शाखा आहेत यामध्ये जवळपास 10 लाख कर्मचारी काम करतात. 63000 एटीएमचं जाळ संपुर्ण देशात आहे. ग्रामीण भागातील बँकांच्या शाखा बंद करु नयेत अशीही कर्मचार्‍यांची मागणी आहे. मुख्य म्हणजे केंद्रसरकारच्या दोन बँकिंग कायदा दुरुस्तीत बँकिंग नियमन अधिनियम 1949 आणि बँकिंग कंपनी ऍक्वीझिशन अँन्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग या अधिनियमात दुरुस्ती करण्याचा केंद्रसरकारचा प्रस्ताव आहे. तीन दिवसांपासून सार्वजनिक सुट्टी आणि आता दोन दिवसांचा बँकांचा संप यामुळे आर्थिक व्यवहारांमध्येअडचणी येऊ शकतात.

close