दारुसाठ्याच्या संशयावरुन पोलिसांकडून गावकर्‍यांना मारहाण

August 23, 2012 10:55 AM0 commentsViews: 1

23 ऑगस्ट

दारुसाठा लपवून ठेवल्याच्या संशयावरुन पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील फरीदपूर गावातील अनेकांना मारहाण केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. पोलिसांच्या धाकामुळे गावातील शाळासुद्धा एक दिवस बंद ठेवण्यात आलीय. फरीदपूर गावात राजकुमार धाडसे यांच्या घरी दारुसाठा असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी धाड घातली. या धाडीदरम्यान पोलिसांची हाती काहीच लागलं नाही, या नंतर पोलीस आणि धाडसे यांच्यामध्ये क्षुल्लक वादावरुन झटापट झाली. या वादानंतर पोलीस गावात कुमक घेऊन दाखल झाले आणि अनेक गावकर्‍यांना मारहाण केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केलाय. या मारहाणीत राजकुमार धाडसे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झालीय. पोलीस अधिक्षकांनी मात्र कारवाईचं समर्थन केलंय. पोलिसांनी आतापर्यंत गावातील 7 ते 8 गावकर्‍यांना अटक केली आहे.

close