विदर्भातील धरणं 100 टक्के भरली

August 22, 2012 11:28 AM0 commentsViews: 1

22 ऑगस्ट

यंदाच्या वर्षी वरुणराजे महाराष्ट्रावर नाराज जरी असले तरी विदर्भावर मात्र खूष आहे. विदर्भात सर्वत्र पाऊस सुरु असल्यामुळे अनेक धरण पूर्ण भरल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे गोंदियातील सर्वचं धऱण तुंडूब भरली आहेत. जिल्हातील सर्वात मोठ ईटीयाडोह धरण शंभर टक्के भरलं असून, या धरणातून 3 फूट पाणी वाहत आहे . धरणातील पाणी नदी पात्रात आणि कालव्यात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येतंय. जिल्हातील पुजारीटोला धरण 83, सालेसराळ धरण, 77 आणि शिरपूर 83 टक्के भरलेलं आहे. पावसामुळे धान लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

close