पिंपरीत अतिक्रमण मोहिमेविरुध्द महायुती रस्त्यावर

August 23, 2012 10:58 AM0 commentsViews: 2

23 ऑगस्ट

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना, रिपाई युती आज अतिक्रमण मोहीमेविरुध्द मोर्चा काढला. विशेष म्हणजे या मोर्चात मनसेही सहभागी झाली होती. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे दीड लाख अनधिकृत बांधकामे आहेत. महापालिका प्रशासनातर्फे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिका हद्दीतली अनधिकृत बांधकामं पाडावी, या भूमिकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठिंबा दिला. अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

close