नाशिकमध्ये साग तस्करांनी वनरक्षकालाच ठेवलं ओलीस

August 22, 2012 11:32 AM0 commentsViews: 67

22 ऑगस्ट

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाण्यात वनरक्षकाला साग तस्करांनी ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांच्या मदतीने या वनरक्षकाची सुटका झाली असली तरी या घटनेनंतर वनरक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. उंबरठाण रेंजमध्ये वनरक्षकांनी सागाची चोरी करणार्‍या एकाला अटक केली होती. त्याची सुटका करण्याच्या मागणीसाठी थेट वनरक्षक सुनिल मटाले यांनाच सागचोरांनी ओलीस ठेवलं. तब्बल 4 तासांनी पोलिसांच्या मदतीनं मटालेंची सुटका करण्यात आली. नाशिकच्या सीमेवर साग तस्करांचा धुमाकूळ वाढलाय. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्यमेंट मात्र सक्षम नाही.

close