सीएसटी हिंसाचाराप्रकरणी आणखी 5 जणांना अटक

August 23, 2012 11:00 AM0 commentsViews: 2

23 ऑगस्ट

मुंबईतल्या सीएसटी हिंसाचाराप्रकरणी आज आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता 48 झालीय. आज कुर्ला, मानखुर्द परिसरातून या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. काल गुरुवारी 19 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोघांना क्राईम ब्रांचची कस्टडी देण्यात आली आहे. निजामुद्दीन शेख आणि मोहम्मद हुसेन कमरुद्दीन असं त्यांचं नाव आहे. निजामुद्दीनला वडाळा तर कमरुद्दीनला कुर्ल्यातून अटक करण्यात आलीय. निजामुद्दीनने मीडियाच्या ओबी व्हॅन जाळल्यात. तर, मोहम्मद हुसेन कमरुद्दीन याने पोलीस व्हॅन जाळण्यात मुख्य भूमिका बजावली होती. येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

close