केबीसी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार

August 22, 2012 12:07 PM0 commentsViews: 2

22 ऑगस्ट

कौन बनेगा करोडपतीच्या 5 यशस्वी सिझननंतर आता 7 सप्टेंबरपासून केबीसीचा सहावा सिझन सुरू होतोय. आज केबीसीच्या व्हॅनचे उद्घाटन बिग बींनी केलं. ही व्हॅन 12 शहरांमध्ये फिरणार आहे. प्रत्येक शहरातल्या प्रेक्षकांना बिग बींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची संधी मिळणार आहे. या नव्या सिझनमध्ये पहिल्यांदाचं केबीसी व्हॅन आणली गेली. सोनीवर 7 सप्टेंबरपासून केबीसीचा सहावा सीझन सुरू होतोय.

close