तिसर्‍या दिवशीही संसद ठप्प, 5 कोटींचे नुकसान

August 23, 2012 11:56 AM0 commentsViews: 6

23 ऑगस्ट

कोळसा खाण घोटाळ्यावरुन सलग तिसर्‍या दिवशीही लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज ठप्प झालंय. तिसर्‍या दिवशीही कोळसा खाण घोटाळा वाटपावरुन पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विरोधकांनी कामकाज चालू दिलं नाही. दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. पण कामकाज तहकूब झाल्यामुळे यामुळे दर दिवसाला जवळपास पावणे दोन कोटींचं नुकसान झालं आहे. जर तिन दिवसांचा हिशेब केला तर तो सरासरी 5 कोटी 10 लाखांच्या घरात जात आहे.

विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे सलग तिसर्‍या दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काम होऊ शकलं नाही. कोळसा खाण घोटाळ्यावरून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, मगच कामकाज सुरू होऊ देऊ, अशी भूमिका भाजपने घेतली. पण गेल्या तीन दिवसात गुरुवारी पहिल्यांदाच ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न झाला.

दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. लोकसभेत भाजपनं बैठकीवर बहिष्कार टाकला. पण सोमवारी चर्चेला तयार असल्याचं सांगितलं. काही वेळानंतर लोकसभेतले सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे यांनी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. पण राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी अधिक कठोर भूमिका घेतली. सरकारने मात्र आपण चर्चेला तयार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. पण आता सोनिया गांधींनीही आपल्या नेत्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिलेत. सोनियांचे पक्षनेत्यांना आदेश आपल्याला बचावात्मक पवित्रा घ्यायची गरज नाही. हे चुकीचं आहे. आपण आक्रमक व्हायला पाहिजे. त्यांनी लोकांना गृहित धरू नये.

दरम्यान, भाजप नेते 2 जी घोटाळ्यावरच्या लोकलेखा समितीच्या बैठकीतून बुधवारी निघून गेले होते. पण समितीतून बाहेर पडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच कोळसा खाण घोटाळ्याच्या मुद्द्यावरून लोकसभेतून सामुहिक राजीनामा देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. पण पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सध्यातरी भाजप ठाम आहेत.

संसद ठप्प, पैशांचा अपव्यय

दर मिनिटाला 36 हजार रु.दर तासाला 21 लाख रु.दर दिवसाला सरासरी 1 कोटी 70 लाख रु.3 दिवसात सरासरी 5 कोटी 10 लाखांचे नुकसान

close