‘यंग ब्रिगेड’ची फायनलमध्ये धडक

August 23, 2012 12:44 PM0 commentsViews:

23 ऑगस्ट

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतानं फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 210 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. चोप्रा आणि कॅप्टन चांदनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. तर अपराजित आणि विहारीने भारताचा स्कोर वाढवला. पण त्यांच्यानंतर एकाही प्लेअरला मोठा स्कोर करता आला नाही. त्यामुळे भारताला फक्त 209 रन्सपर्यंतच मजल मारता आली. पण भारताच्या बॉलर्सने कमालीची कामगिरी केली. संदीप शर्मा, हरमीत सिंग आणि रवीकांत सिंग या तीनही बॉलर्सने प्रत्येकी दोन विकेट घेत न्यूझीलंडला धक्के दिले. 44 रन्स आणि 1 विकेट घेणारा बाबा अपराजीत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आता फायनलमध्ये भारताची गाठ पडणार आहे ती वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी…

close