सीएसटी हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 43 जणांना अटक

August 22, 2012 4:25 PM0 commentsViews: 1

22 ऑगस्ट

मुंबईतल्या सीएसटी हिंसाचाराप्रकरणी गेल्या 24 तासांत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हिंसाचाराप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता 43 झाली आहे. आज आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. निजामुद्दीन शेख आणि मोहम्मद हुसेन कमरुद्दीन अशी त्यांची नावं आहेत. निजामुद्दीनला वडाळा तर कमरुद्दीनला कुर्ल्यातून अटक करण्यात आली आहे. निजामुद्दीन मीडियाच्या ओबी व्हॅन जाळण्यात अग्रेसर होता. तर, मोहम्मद हुसेन कमरुद्दीन यानं पोलिस व्हॅन जाळण्यात मुख्य भूमिका बजावली होती. या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी अटक केलेले हे 19 जण कोण आहेत ?

- नियाजुद्दीन जान मो. शेख – वडाळा (मीडियाची ओबी व्हॅन जाळली)- मो. हुसेन कमरुद्दीन अन्सारी – कुर्ला (पोलिसांची व्हॅन जाळली)- अस्लम मो. खान – वांद्रे(पू.) गरीबनगर- सय्यद युनूस सय्यद मुनावर – वांद्रे(पू.) गरीबनगर- मो. रिझवान मो. इस्माईल – वांद्रे(पू.) गरीबनगर- मो. सईद अजिझ इदि्रस – वांद्रे(पू.) गरीबनगर- लियाकत हुसेन – वांद्रे(पू.) गरीबनगर- नौशाद रफी अहमद खान – वांद्रे(पू.) गरीबनगर- सलीम मेहताब शेख – वांद्रे(पू.) गरीबनगर- मो. इम्तियाज – मालाड (पू.) मकरंद पाडा- मो. अजिझ ऊर्फ कालू – मालाड (पू.) मकरंद पाडा- अमीर युनूस शेख – मरोळ- अशरफ सिराझुल हक – कुर्ला- हाफीज अहमद शेख – कुर्ला- मो. हकीम – कुर्ला- परवेझ अन्सारी – शिवडी कोळीवाडा- मो. अख्तर मुस्तकील शेख – शिवडी कोळीवाडा- जावेद शकील खान – शिवाजी नगर, गोवंडी- शेख मो. युसूफ – शिवाजी नगर, गोवंडी

close