पोलिसांचं मनोधैर्य खचल्याचं नव्या पोलीस आयुक्तांकडून कबूल

August 23, 2012 3:36 PM0 commentsViews: 5

23 ऑगस्ट

मुंबई पोलिसांवरचा लोकांचा विश्वास उडालाय आणि मुंबई पोलीस दलाचं मनोबल खचलंय या अडचणींवर मात करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असेल असं मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी म्हंटलं आहे. अरुप पटनायक यांची बढतीवर बदली करण्यात आल्यानंतर सत्यपाल सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पोलिसांवरील लोकांचा उडालेला विश्वास परत मिळवणं, तसंत पोलीस दलाचं काम पारदर्शक करणं या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे असंही सत्यपाल सिंह म्हणाले.

सत्यपाल सिंह यांच्या कारकिर्द

- 1980 बॅचचे आयपीएस अधिकारी- मुंबईत झालेल्या 2002-03 बॉम्बस्फोटांच्या तपासात सहभागी- मुंबईत खंडणीविरुद्ध पथकांची स्थापना केली- 1997 : गुंडांविरोधात मोहीम उघडली- 2010 : पुण्याचे पोलीस आयुक्त बनले- त्यांच्या कारकिर्दीत जर्मन बेकरीत स्फोट झाला आणि तपासाला सुरुवात झाली- पुण्यात गृहराज्यमंत्री रमेश बागवेंशी वाद आणि त्यामुळे कारकीर्द वादग्रस्त ठरली – पोलीस उपायुक्त, अतिरीक्त पोलीस आयुक्त, सहपोलीसआयुक्त म्हणून काम केली

close