मुंबई, पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी बीडमध्ये झाडाझडती

August 24, 2012 11:14 AM0 commentsViews: 11

24 ऑगस्ट

मुंबई, पुणे मधल्या बॉम्ब स्फोटाप्रकरणी अधिक तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे. बीड शहरात 9 मुख्य वसाहतीत 38 घरांची झडतीही घेण्यात आली. यात या पथकाला लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर, सीडीज आणि काही महत्वाच्या ठिकाणांचे नकाशे आढळून आले आहे. एका घरी बेहिशेबी 26 लाख रुपयेही सापडले आहे. पथकाने आज 28 जणांची कसून चौकशी केली तर 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या पथकाने कान्कालेश्वर मंदिर परिसर, बालेपीर, कागदिवसे याशिवाय काही आणखी मुख्य वसाहतीत छापे मारले. पुणे – मुंबई बॉम्बस्फोटातील काही महत्वाचे धागेदोरे हे या छाप्यातून मिळण्याची शक्यता आहे. या पथकात दोन पोलीस महानिरिक्षक, चार पोलीस अधिक्षक यांच्यासह बीड शहरातील पोलीस कर्मचारीही सहभागी आहेत.

close