भारतातल्या पर्यटन व्यवसायावर परिणाम

November 28, 2008 1:57 PM0 commentsViews: 8

28 नोव्हेंबर मुंबईभारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येनं परदेशी पर्यटक येतात. पण,यावर्षी आलेल्या पर्यटकांसाठी ही टूर दुदैर्वी ठरली. दहशतवाद्याच्या छायेत तीन दिवस काढल्यानंतर पर्यटकांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. पण तरीही भारतात येण्याची भीती आम्हाला वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं. या परदेशी पर्यटकांनी गेल्या तीन दिवसात जे प्रसंग अनुभवले, ते कधीही विसरणार नाहीत. एनएसजी आणि लष्कराच्या जवानांनी ओबेरॉय हॉटेलमधून एकशे अठरा जणांना हॉटेलमधून यशस्वीरित्या बाहेर काढलं. त्यामध्ये 15 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सुखरूप सुटका झालेले पर्यटक सांगतात, गेले दोन दिवस आम्ही एकाच रूममध्ये अडकून होतो. अशा प्रसंगांना भीक न घालता, पर्यटनासाठी आम्ही पुन्हा भारतात येऊ, असा निर्धारही या परदेशी पर्यटकांनी व्यक्त केलं आहे. या परदेशी नागरिकांना सुखरूपपणे मायदेशी पाठवण्यासाठी ब्रिटिश काउन्सिलेट प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे येत्या काही दिवसात भारतातल्या पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होणार, हे मात्र नक्की.

close