लान्स आर्मस्ट्राँगची सर्व जेतेपद रद्द

August 24, 2012 11:45 AM0 commentsViews: 8

24 ऑगस्ट

कॅन्सरवर मात करुन टूर दी फ्रान्स ही जगातली सर्वात खडतर मानली जाणारी सायकलिंग स्पर्धा तब्बल सात वेळा जिंकणारा लान्स आर्मस्ट्राँग नव्या वादात अडकला आहे. उत्तेजक चाचणीस नकार दिल्याने अमेरिका उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था अर्थात USADA नं आर्मस्ट्राँगची सर्व जेतेपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय स्पर्धात्मक सायकलिंगमध्येही त्याच्यावर आजन्म बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. आर्मस्ट्राँगने 1999 ते 2005 या कालावधीत टूर दी फ्रान्सवर वर्चस्व राखत तब्बल 7 वेळा जेतेपदं पटकावलंय. पण या कामगिरीनंतर त्याच्यावर उत्तेजक द्रव्य घेतल्याचा आरोप झाला होता. पण अशा आरोपांना उत्तर देण्यासाठी उत्तेजक चाचणी करण्याची मला गरज नाही असं सांगत आर्मस्ट्राँगने यूएसएडीएचे आरोप फेटाळले.

close