सुनील तटकरेंविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल

August 24, 2012 1:29 PM0 commentsViews: 8

24 ऑगस्ट

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, त्यांचे कुटुंबीय आणि सहकार्‍यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि माधव भंडारी यांनी ही याचिका सादर केली आहे. जलसिंचन घोटाळ्यातले पैसे तटकरेंच्या बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांची अकाऊंट गोठवा, कंपन्यांच्या व्यवहारांची एसआयटीकडून चौकशी करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोर्ट ही याचिका दाखल करुन घेतं की काही नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close