लवासाला दिलासा, दंड भरुन बांधकाम सुरु होणार

August 23, 2012 5:11 PM0 commentsViews: 1

23 ऑगस्ट

पुण्यातील वादग्रस्त लवासा प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला आहे. सिलिंग झालेल्या जमिनी नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दंड भरून या जमिनी नियमित होणार आहेत. पण लवासाच्या प्रकल्पाला विरोध करणारे कार्यकर्ते याविरुद्ध संघर्षाच्या तयारीत आहेत. लवासा उभारण्यासाठी स्थानिक आदिवासींना अंधार ठेवून जमिनी हडपण्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांना केला होता. सुप्रीम कोर्टाने लवासाच्या कामावर स्थगिती आणली आहे. काहीदिवसांपुर्वी दोन आदिवासींना लवासातील जमीन परत करण्यात आल्या आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाला मोठे यश मिळाले होते. आता लवासाला दिलासा मिळाल्यामुळे दंड भरून बांधकाम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

close