अबू आझमींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

August 24, 2012 1:37 PM0 commentsViews: 22

24 ऑगस्ट

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात सपाचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीवरुन तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आझमी यांची तलासरी तालुक्यातील डोंगरी आणि विलातगाव परिसारात सत्तर एकर जमीन आहे. डोंगरी गावातील पाच एकर जमिनीवर स्थानिक आदिवासीचं अतिक्रमण असून ते गेल्या 25 वर्षापासून भातशेती करतात. मात्र आझमी यांनी बुल्डोजर फिरवून पिक नष्ट केल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे. शेतकर्‍यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. तसेच आदिवासींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही शेतकर्‍यांनी केला.

close