डॉ.सुदाम मुंडेच्या मुलाला अटक

August 23, 2012 2:21 PM0 commentsViews: 1

23 ऑगस्ट

परभणी येथील परळी स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी डॉ.सुदाम मुंडेचा मुलगा व्यंकटेश मुंडे याला अडीच महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. व्यंकटेश मुंडे हा अडीच महिन्यांनंतर पोलिसांना शरण आला आहे. याप्रकरणात पोलीस व्यंकटेश मुंडेला सहआरोपी करणार आहेत. व्यकंटेशसोबत चार जणांना अटक करण्यात आली आहे. बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्याप्रकरणी डॉ.मुंडे दामप्त्याच्या क्रुरकृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एकच हादरा बसला होता. याप्रकरणी दीड महिना फरार झालेल्या मुंडे दाम्पत्य पोलिसांना शरण आले होते. मात्र आपले आई वडील तिर्थदर्शनला गेले होते असा दावा केला होता. मुंडेंच्या मुलाने त्यांना पळू जाण्यास मदत केली होती.

close