जमिनीसाठी वयोवृध्द शेतकरी झिजवत आहे कार्यालयाचे उंबरठे

August 24, 2012 1:47 PM0 commentsViews: 3

24 ऑगस्ट

जमिनीच्या मोबदल्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या हाडोळी गावचे वयोवृद्ध शेतकरी 20 वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशालाही प्रशासनाने केराची टोपली दाखवली. त्यामुळे या शेतकर्‍यांनी आता उपोषणाचा मार्ग निवडलाय. पाझर तलावासाठी 20 वर्षांपूर्वी या शेतकर्‍यांच्या जमिनी अत्यल्प किंमतीला सरकारने घेतल्या. त्याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले. जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला. पण शेतकर्‍यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हे शेतकरी हक्काच्या पैशांसाठी सरकारशी लढताहेत.

close