चौथ्या दिवशीही संसदेचं कामकाज तहकूब

August 24, 2012 1:53 PM0 commentsViews: 3

24 ऑगस्ट

कोळसा खाण घोटाळ्यावरून संसदेची दोन्ही सभागृहं सलग चौथ्या दिवशीही तहकूब करण्यात आली. ही कोंडी फोडण्यासाठी सोमवारी दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. पण या बैठकीत तोडगा निघाला नाही तर सरकार अधिवेशनच गुंडाळेल अशी भीती विरोधकांना वाटत आहे. विरोधकांनी पंतप्रधानांना सभागृहात निवेदन सादर करू द्यावं असं आवाहन सरकारने आज पुन्हा एकदा केलंय. इतकंच नाही तर सरकारच्या महत्त्वाच्या मंत्र्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि कोळसा खाण वाटप घोटाळ्यासंबंधीचा कॅगचा अहवाल दोषपूर्ण असल्याचं सांगितलं. कोळसा खाण वाटपामुळे सरकारचं एक रुपयाचंही नुकसान झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close