औरंगाबादमध्ये पाण्याचा अपव्यय केल्यास दंड

August 24, 2012 10:26 AM0 commentsViews: 140

24 ऑगस्ट

राज्यातील 122 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. मराठवाड्यातील आठही धरणं कोरडी पडली आहेत. औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणामध्ये सध्या फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. शहरातल्या काही भागांमध्ये 4 दिवसांनंतर तर काही भागांमध्ये आठवडाभरानंतर पाणी मिळतंय. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग केल्यास औरंगाबाद महापालिका दंड वसुल करणार आहे. त्यासाठी महापालिकेनं दक्षता पथक नेमून जे कुणी पिण्याचा पाण्याचा अपव्यय करतील त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

पाण्याच्या पाण्याचा गैरवापर केला तर काय कारवाई होणार – अंगण, ओटा धुण्यासाठी पाणी वापरल्यास – 100 रु. – वाहन धुण्यासाठी वापरल्यास – 200 रु. – बागेमध्ये पाणी टाकल्यास – 200 रु. – नळाला तोटी न लावल्यास – 300 रु. – बांधकामासाठी पाणी वापरल्यास – 500 रु.

close