एमसीएच्या अध्यक्षपदी रवी सावंत यांची निवड

August 24, 2012 4:06 PM0 commentsViews: 3

24 ऑगस्ट

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या हंगामी अध्यक्षपदी रवी सावंत यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर एमसीएचे नवे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता होती. उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी आणि खजिनदार रवी सावंत हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. रवी सावंत यांना दहा तर रत्नाकर शेट्टी यांना 5 मतं मिळाली. रवी सावंत हे महाडदळकर गटाचे आहेत तर रत्नाकर शेट्टी शरद पवार गटाचे असूनही त्यांना पराभवाचा धक्का बसलाय. रवी सावंत यांना दिलीप वेंगसरकर गटाचा पाठिंबा मिळाला.

close