चौथे विश्व साहित्य संमेलन अखेरीस रद्द

August 25, 2012 9:31 AM0 commentsViews: 2

25 ऑगस्ट

चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन अखेर रद्द झालंय. टोरंटोमध्ये हे संमेलन होणार होतं. मात्र तिकिटांच्या घोळामुळे हे संमेलन आता रद्द होतंय. तिथं होणार्‍या संमेलनाचे अध्यक्ष रानकवी ना. धों. महानोर आहेत. महानोर यांच्यासह साहित्य महामंडळाचे काही पदाधिकारी अशी केवळ सहा तिकिटंच त्यांना पाठवण्यात आली आहेत. या संमेलनासाठी 40 जणं जाणार होते. पण इतर 34 जणांची तिकिटं मिळाली नसल्याने त्यांच्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी भूमिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी घेतलीय. त्यामुळे टोरंटो इथं होणार्‍या या संमेलन दुसर्‍यांदा रद्द होण्याची नामुष्की ओढली आहे.

close