टू जी घोटाळा प्रकरणी चिदंबरम यांना कोर्टाचा दिलासा

August 24, 2012 11:02 AM0 commentsViews: 4

24 ऑगस्ट

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. 2 जी घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 2 जी स्पेक्ट्रमच्या किंमती माजी टेलिकॉम मंत्री ए.राजा आणि पी चिदंबरम यांनी मिळून निश्चित केला असा सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप होता. पण चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

close