दुष्काळासाठी केंद्राकडून मदत नाहीच !

August 25, 2012 10:44 AM0 commentsViews: 2

25 ऑगस्ट

दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला कोणतीही तातडीची मदत दिली जाणार नाही. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची याबाबत भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी राज्याच्या या मागणीचा विचार करण्याची सुचना नियोजन आयोगाला केली आहे. महाराष्ट्राने केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी 3,572 कोटींची मागणी केली आहे. पुढच्या वर्षभरात पूर्ण होणार्‍या 105 सिंचन प्रकल्पांसाठी 2270 कोटी रुपयांची मागणी केली. वेगवेगळ्या पाच मुद्यांवरुन राज्य सरकारनं केंद्राकडं अनुदानाचीही मागणी केली आहे. केंद्र सरकारचे उच्चाधिकारी राज्यातल्या अधिकार्‍यांबरोबर याबाबत एक बैठक घेणार आहेत. राष्ट्रीय दुष्काळ मदत निधीच्या ऐवजी केंद्र सरकारने राष्ट्रीय दुष्काळ निवारण निधी उभारावा अशी विनंती महाराष्ट्राने केंद्राला केली आहे.

close