रेल्वेमधून आरोपीला फेकणारे 4 रेल्वे पोलीस ताब्यात

August 27, 2012 10:59 AM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट

चालत्या लोकलमधून एका आरोपीला बाहेर फेकल्याच्या आरोपावरुन चार रेल्वे पोलिसांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चारही पोलीस रेल्वे क्राईम ब्रांचशी संबंधीत आहेत. वडाळा रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केलीय. 18 ऑगस्टला 40 वर्षाच्या हब्बीउल्ला अताउल्ला खान यांना टिळकनगर रेल्वे स्टेशनवरुन अटक केली. मात्र अटक केल्यानंतर पोलीस आणि खान याच्यात वाद झाल्यानंतर पोलिसांनी धावत्या ट्रेनमधून त्याला बाहेर फेकून दिल्याचा पोलिसांवर संशय आहे. या घटनेत पिडीताला आपला पाय गमावावा लागला असून सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहे.

close