नाशिकमध्ये एव्हरेस्ट कंपनीच्या 3 अधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला

August 25, 2012 10:48 AM0 commentsViews: 3

25 ऑगस्ट

नाशिकमध्ये एव्हरेस्ट कंपनीतल्या तीन अधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सीटूचे नेते डॉ. डी एल कराड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 10 महिन्यांपासून एव्हरेस्ट कंपनीमध्ये कामगारांचा संप सुरू होता. त्याबाबत तोडगा काढण्यासाठी कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, तोडगा निघू शकला नाही. त्याबैठकीनंतर बाहेर आलेल्या कंपनीच्या तीन अधिकार्‍यांवर एका कामगाराने हल्ला केला. त्यांच्यांपैकी एका अधिकार्‍यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, डॉ. कराड यांना या प्रकरणात गोवण्यात आलं असून त्यांची सुटका करावी या मागणीसाठी सिटूतर्फे मोर्चा काढला.

close