‘नैतिक जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा’

August 27, 2012 11:11 AM0 commentsViews: 5

27 ऑगस्ट

कोळसा खाणवाटप घोटाळ्यासाठी थेट पंतप्रधान मनमोहन सिंग जबाबदार आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. खाणवाटपात मिळालेला महसूल काँग्रेसच्या तिजोरीत गेल्याचा आरोप भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी केला. 142 खाणींचे वाटप रद्द करावे आणि नव्याने निविदा काढाव्यात असं भाजपनं म्हटलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निवेदन अयोग्य आणि घटनात्मक संस्थांवर प्रहार करणारं आहे. पंतप्रधानांनी कॅगवर टीका करायला नको होती, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. एनडीएतल्या इतर पक्षांचा पाठिंबा मिळाला नाही तरी भाजप आपली लढाई सुरूच ठेवणार असल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे.

close