केजरीवाल यांच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली

August 25, 2012 11:07 AM0 commentsViews: 2

25 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्या उद्याच्या रॅलीला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गेला आठवडा संसद ठप्प होण्याच्या कारणावरुन रविवारी इंडिया अगेंस्ट करप्शनचे कार्यकर्ते पंतप्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालणार होते. जंतरमंतरवरुन या रॅलीला सुरुवात होणार होती.

पण संसदेचं अधिवेशन अजूनही सुरु असल्याने या रॅलीला आपण परवानगी देऊ शकत नसल्याचं एका पत्रात दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल आणि इंडिया अगेंस्ट करप्शनला कळवलं आहे. कोळसा खाण घोटाळ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याविरोधात इंडिया अगेंस्ट करप्शनने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि ओरीसाच्या मुख्यमंत्र्यांच्या घरांबाहेरही घेराव घालण्याचं ठरवलं आहे. पण त्यांच्याच टीममध्ये दुफळी माजल्याचं दिसतंय. किरण बेदी यांच्या मते जो पक्ष सत्तेत आहे त्यांच्याच नेत्यांच्या घरांना घेराव घालणं योग्य आहे.

close