‘टोरंटोत संमेलन झालं तर ते अनधिकृतच’

August 27, 2012 11:36 AM0 commentsViews: 4

28 ऑगस्ट

टोरंटो येथील चौथ्या विश्व साहित्य संमेलन रद्द झाल्याचं मागिल शनिवारी जाहीर करण्यात आलं होतं. या संमेलनला साहित्यिक आणि साहित्य मंडळाचे, पदाधिकारी जाणार नाहीत. तरीही संमेलन झालंच तर ते अनधिकृत असेल अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून टोरंटोला जाणार्‍या विमानाची तिकीटं मिळत नसल्यानं साहित्यिक जाणार नाहीत. संमेलनाच्या तारखांचा फेरविचार करुन सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात संमेलनाचं आयोजन करावं असा प्रस्ताव साहित्य महामंडळाने आयोजकांकडे ठेवला होता. मात्र आयोजकांना नियोजित तारखांनाच संमेलन होणारचं असं सांगितलं. आयबीएन लोकमतशी बोलताना आयोजक लीना देवधरे यांनी संमेलन साहित्यिकांविना झालं तरी चालेल अशी भुमिका घेतलीय.

close