कोळसा खाण वाटपांवर स्थगिती

August 25, 2012 12:41 PM0 commentsViews: 4

25 ऑगस्ट

कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी सर्व खाणींच्या वाटपांवर स्थगिती आणली आहे. खाण विधेयक संसदेत पास होईपर्यंत हे वाटप स्थगित असेल, असं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. ऍटर्नी जनरल यांच्यासोबत याबद्दल पुन्हा चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, आज विरोधकांनी पुन्हा सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारने दावा केला होता की, कोळसा खाण वाटपात सरकारी तिजोरी कोणतही नुकसान झालं नाही. याच मुद्द्यावरून आज अरूण जेटलींनी पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारने दिलेल्या कोळसा खाणी या खासगी कंपन्यांच्या ताब्यात आहेत हे सरकार विसरतंय असं भाजपनं म्हटलंय. सरकार देशाची दिशाभूल करतंय, असं जेटली म्हणाले.

close