भाजपचे ‘सेनापती’ शिलेदारांना मैदानात सोडून परदेशवारीवर

August 27, 2012 1:18 PM0 commentsViews: 2

27 ऑगस्ट

कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरुन पंतप्रधान मनमोहन सिंग वादात अडकले आहे. याच प्रकरणावरुन भाजपने संधी साधत पंतप्रधानांच्या विरोधात मैदानात उतरले आहे पण सेनापती मात्र परदेशवारीत व्यस्त असल्याचे समोर आले आहे. भाजपने संसदेचं कामकाज पाच दिवसांपासून ठप्प केलं. कोणतही कामकाज होऊ दिलं नाही. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावी अशी मागणीही भाजपने केली आहे. पण या गदारोळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी मात्र परदेशवारीवर गेले आहे. नितिन गडकरी वैयक्तीक कौटुंबिक सुट्टीवर कॅनडाला गेले आहेत. दोन दिवसांपुर्वीच नितीन गडकरी कुटुंबासह कॅनडाला रवाना झाले आहेत. आणि ते पंधरा दिवसांनी भारतात परत येणार आहे. एकीकडे भाजपचे नेते मैदानात लढत असताना सेनापती मैदान सोडून परदेशवारीला जातात कसे याबद्दल भाजपमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

close