हैदराबाद टेस्टवर भारताची पकड

August 25, 2012 12:57 PM0 commentsViews: 6

25 ऑगस्ट

हैदराबाद टेस्टवर भारताने मजबूत पकड जमवली आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला फक्त 159 रन्समध्येच ऑल आऊट करत फॉलोऑन दिला. भारतातर्फे आर.आश्विननं सर्वाधिक विकेट घेतल्या. अश्विनने 16 ओव्हरमध्ये फक्त 31 रन्स देत तब्बल 6 विकेट घेतल्या आहे. अश्विनला साथ दिली ती प्रग्यान ओझानं. ओझानं 3 विकेट घेतल्या. पहिल्या दिवसअखेर 106 रन्सच्या स्कोरवरुन न्यूझीलंडने आजच्या दिवसाची सुरुवात केली. पण भारतीय स्पिनर्सच्या मार्‍यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडतर्फे जेम्स फ्रँकलिननं सर्वाधिक 43 रन्स केले.

close