किरण बेदी आणि केजरीवाल यांच्यात मतभेद उघड

August 27, 2012 1:42 PM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्य सहकारी सहकारी किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले आहे. भाजप नाही तर सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य करण्याची गरज आहे. यापुढेही सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करण्यात येणार असेल तरच आंदोलनात सहभागी होऊ असं बेदी यांनी स्पष्ट करुन टाकलं आहे. सत्ताधारी पक्ष कायदे बनवू शकतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं पाहिजे. प्रत्येकालाच विरोध केला तर तुमच्याबरोबर कोण येणार, असा सवालही बेदी यांनी विचारला आहे.काल रविवारी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इंडियाअगेन्सट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा निषेध म्हणून रॅली काढली होती या रॅलीत मात्र किरण बेदी सहभागी झालेल्या नव्हत्या. टीम अण्णा आता राजकारणात उतरणार आहे अशी घोषणा करत अण्णांनी टीम अण्णा बरखास्त केली. यानंतर अण्णांनी माध्यमांशी बोलणं बंद केलं. तर दुसरीकडे बेदी आणि केजरीवाल एकमेकांच्या विरोधात सुर लगावत आहे.

close