राजस्थानला पुराचा फटका

August 25, 2012 1:04 PM0 commentsViews: 9

25 ऑगस्ट

राजस्थानमध्ये निसर्गाचा कोप सुरुच आहे. या वर्षांच्या सुरुवातीला दुष्काळाला तोंड देणार्‍या राजस्थानला आता पुराचा सामना करावा लागत आहे. राजस्थानातील अनेक भागाला पुराचा फटका बसला आहे. यात राजधानी जयपूरचाही समावेश आहे. अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत 33 जणांना प्राण गमवावे लागलेत. जयपूर आणि सिकारमध्ये लष्कराची मदत घेण्यात येतेय. झुंजझुंनू, चुरू, ढोलपूर, भारतपूर, कोराली आणि दौसा या जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसलाय. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. अनेक शहरांमध्ये पाणी भरलेलं आहे.

close