अ ॅपलचा दणका, ‘सॅमसंग’ला 5.5 हजार कोटींचा दंड

August 25, 2012 1:09 PM0 commentsViews: 93

25 ऑगस्टस्मार्टफोन मोबाईल उत्पादनात अग्रेसर ऍपल आणि सॅमसंग यांच्यातील कायदेशीर लढाईत ऍपलने बाजी मारली आहे. ऍपल कंपनीची पेटंट चोरल्याप्रकरणी कोर्टाने सॅमसंग मोबाईल कंपनीला दोषी ठरवलं आहे. ज्युरींनी सॅमसंग कंपनीला सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा म्हणजे साडेपाच हजार कोटी रुपये दंड ठोठावला आहे. सॅमसंगने सॅमसंग टॅब आणि स्मार्टफोन बनवताना ऍपलचे अनेक सॉफ्टवेअर्स कॉपी केल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. कॅलिफोर्नियातील सॅन होजे न्यायालयात ही कायदेशीर लढाई सुरु होती. या निर्णयाबरोबर ऍपल कंपनीच्या शेअर्सनी 2 टक्यांनी उसळी घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून दोन कंपन्यामध्ये कायदेशीर युध्द सुरु होतं. मात्र अखेरील ऍपलच्या बाजूने निकाल लागत सॅमसंगला एकच झटका दिला आहे.

close