‘आदर्श प्रकरणात सॅन फायनान्सच्या संचालकांना आरोपी करावे’

August 27, 2012 5:20 PM0 commentsViews: 2

27 ऑगस्ट

सुधाकर काश्यप, मुंबई

आदर्श प्रकरणात सॅन फायनान्स या कंपनीच्या संचालकांनाही आरोपी करण्यात यावं अशा मागणीचा अर्ज आज मुंबई हायकोर्टात करण्यात आला आहे. हा अर्ज जनहित याचिकाकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी केला. सॅन फायनान्स या कंपनीने आदर्श सोसायटीत सदस्य असणार्‍या दहा जणांना कर्ज दिलंय. या पैशाचे कायदेशीर व्यवहार झालं नसल्याने हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असं वाटेगावकर यांचं म्हणणं आहे. सॅन फायनान्स या कंपनीने दहा आदर्श सोसायटीत फ्लॅट मिळालेल्या दहा जणांना घरं घेण्यासाठी पेसै दिले आहे.त्यामुळे सॅन फायनान्स या कंपनीचे संचालक अभय संचेती, अजय संचेती आणि आनंद संचेती यांना आरोपी करावं अशी मागणी वाटेगावकर यांनी केली. अजय संचेती हे भाजपचे खासदार आहेत आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचे ते निकटवर्तीय आहेत.

सॅन फायनान्सने आदर्श सोसायटीत दहा जणांना पैसे दिले आहेत. यामध्ये (फ्लॅटधार आणि फ्लॅट क्रमांक)सुधाकर मडके – 903 ,सुरेश अत्राम – 904 , परमवीर संचेती – 1003 , राजेश बोरा – 1004, चे.पी.शर्मा – 2502, मनीलाल ठाकूर – 2503, पी.एच.राम 2504, प्रेमानंद हिंदुजा-1103, अमरजीत सिंग- 1104,अमरसिंग वाघमारे – 702

या दहा जणांना पैसे दिले आहेत. पण काहिंच्या खात्यावर पैसे टाकले आहेत कर काहिंचे पैसे परस्पर भरले आहेत.या अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचं यााचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. आदर्श प्रकरणात उद्या मुंबई हायकोर्टात नियमित सुनावणी होणार आहे. यावेळी या अर्जाचीदखल घेतली जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यावर सीबीआयला आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टच आदेश करण्याची शक्यता आहे.

close