क्रिकेटच्या मैदानातला उन्’मुक्त’ !

August 27, 2012 5:45 PM0 commentsViews: 12

27 ऑगस्ट

भारताच्या वर्ल्ड कप विजयात महत्वाची भूमिका बजावलेल्या 19 वर्षाच्या युवा कॅप्टननं क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. विनिंग शॉटनंतर उन्मुक्त चंदची युवा टीम अंडर 19 चे वर्ल्ड चॅम्पियन झाले. भारताच्या या यंग टीमचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. या दर्जेदार खेळाचं प्रदर्शन करत भारतीय खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली.

कॅप्टन उन्मुक्त चंद म्हणतो, आम्हाला माहित नाही की, आम्ही परत एकत्र कधी खेळू… कदाचीत एकत्र खेळणारही नाही. त्यामुळे हे आमच्यासाठी खूप भावनिक आहे. म्हणून जी सुरुवात आम्ही केलीये त्याचा शेवट चांगला होईल हाच आमचा प्रयत्न असेल.

सध्या या विजयाचा जल्लोष सर्वत्र सुरु आहे. पण एकदा हा विजयोत्सव संपला की या सर्वांची खरी परीक्षा सुरु होणार आहे. अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमधून भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अनेक खेळाडूंना आपली जागा टीकवता आली नाही. तर काही खेळाडूंनी या संधीचा फायदा उचलत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. कॅप्टन उन्मुक्त चंदनने पहिली लढाई तर जिंकलीय, पण आता खर्‍या अर्थानं त्याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. आता उन्मुक्त चंद लंबी रेस का घोडा ठरणार का हे येणार्‍या दिवसात स्पष्ट होईलच.

close