मित्राने धमकी दिल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

August 27, 2012 10:08 AM0 commentsViews: 7

27 ऑगस्ट

मित्राने बहिणीसोबत बलात्कार करण्याची धमकी दिल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. 10 वीत शिकणार्‍या राहुल निषाद या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली. सुसाईट नोट जप्त केल्यावर पोलिसांनी आरो़पींनी अटक केली आहे. वर्तकनगरमध्ये राहणारा राहुल आणि शेजारी राहणारा 22 वर्षीय मनीष रांगले हा जिवलग मित्र होता. काही दिवसापुर्वी मनीषचं लग्न झालं. काही कारणावरुन राहुल आणि मनीषचं भांडण झालं. त्यानंतर मनीषनं राहुलच्या बहिणीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. भितीपोटी राहुलने आपल्या घरी आत्महत्या केली. पोलिसांनी घेतलेल्या झडतीनंतर सुसाईड नोटवरुन मनीषचं कृत्य उघड झालं. पोलिसांनी तातडीने राहुलला अटक केली आहे.