खाण वाटपावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पत्रयुद्ध

August 28, 2012 5:28 PM0 commentsViews: 1

28 ऑगस्ट

कोळसा खाणवाटपाच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये पत्रयुद्ध रंगलंय. एकमेकांवर केलेले आरोप खरे आहेत हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्ष जुने पत्रव्यवहार जाहीर करत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं एक पत्र आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलं आहे. नोव्हेंबर 2007 मधलं हे पत्र आहे. त्यात, अतिरिक्त कोळसा रिलायन्स पॉवरला देण्याची शिफारस शिवराज सिंह चौहान यांनीच केली होती. कॅगच्या अहवालातही या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. या पत्राला उत्तर म्हणून भाजपनंही एक पत्र उघड केलंय. केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं हे पत्र आहे. यात आपल्या स्वतःच्या कंपनीला लायसन्स देण्याची मागणी सुबोधकांत सहाय यांनी केलीय. ही विनंती सरकारनं तात्काळ मान्य केल्याची माहिती आहे.

close