अमर जवान स्मारक तोडणार्‍याला अखेर अटक

August 28, 2012 10:26 AM0 commentsViews: 4

28 ऑगस्ट

मुंबई हिंसाचारप्रकरणात अमर जवान स्मारकाची तोडफोड करणार्‍याला दंगेखोराला क्राईम ब्रांचने अटक केली आहे. अब्दुल कादीर मोहम्मद युनुस अन्सारी (वय19) असं या दंगेखोरांचे नाव आहे. 11 ऑगस्टला रझा अकादमी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. दंगेखोरांनी हैदोस घालत बेस्ट बसेस, पोलीस आणि माध्यमांच्या वाहनांची तोडफोड करुन पेटवून दिली होती. हे दंगेखोर एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी पोलिसांनाही मारहाण केली होती. तसेचमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशवादी हल्ल्यात ज्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते त्या जवानांच्या शहिदांच्या नावाने बांधण्यात आलेल्या स्मारकाची दंगेखोरांनी नासधूस केली होती. अमर जवानाची तोडफोड झाल्यामुळे सर्व स्तरातून याचा निषेध होत होता. सोशलमीडिया फेसबुक,ट्विटरवरुन याचा निषेध व्यक्त होत होता. या प्रकरणी पोलिसांनी आधी अब्दुल याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीनंतर अब्दुलनेच स्मारकाची तोडफोड केल्याची पोलिसांची खात्री पटली आहे. आज दुपारी दंगेखोर अब्दूलला किला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

close