बाबा रामदेवांच्या पतंजली ट्रस्टचा दर्जा रद्द ?

August 28, 2012 5:43 PM0 commentsViews: 15

28 ऑगस्ट

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाचा चॅरिटेबल ट्रस्टचा दर्जा रद्द होण्याची शक्यता आहे. ट्रस्टचं उत्पन्न निल असल्याचा दावा ट्रस्टकडून करण्यात आलाय. पण उत्पन्न 72 कोटींच्या वर असल्याचे इन्कम टॅक्स विभागाला आढळून आलं आहे. बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्णही इन्फोर्समेंट डिरोक्टोरेटच्या रडारवर आहेत. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये ट्रस्टची स्थापन करण्यासाठी बालकृष्ण यांनी बनावट पासपोर्टचा वापर केल्याचा आरोप आहे. त्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय.

close