दहशतवादी मुंबईत आले कसे?

November 29, 2008 10:36 AM0 commentsViews: 8

29 नोव्हेंबर, मुंबई मंदार फणसे (न्यूज एडिटर आयबीएन-लोकमत)गेले 3 – 4 दिवसांपासून मुंबईत चाललेला थरार आपण अनुभवत आहोत, तो आता सगळा संपलेला आहे. त्या थरारामागचं भीषण सत्य आता हळुहळु बाहेर यायला लागलं आहे. तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ख-या अर्थाने त्यातले अनेकानेक कंगोरे स्पष्ट व्हायला लागले आहेत. ' अल् – कुबेर ' या जहाजाचा वापर करून हे सगळे दहशतवादी मुंबईत घुसले. हा सुनियोजीत असा कट होता. अल् – कुबेर हे जहाज साधारणपणे 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान गुजरातच्या पोरबंदर किना-यावरून निघालं. हे जाहज चुकून पाकिस्तानी हद्दीत थोडं पुढं गेलं. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत अर क्रीक परिसरात ' अल् – कुबेर 'चं अपहरण करण्यात आलं. आतापर्यंतची या जाहजाच्या अपहरणाबाबतची जी माहिती आहे ती अशी आहे की, या जाहाजावर 5 खलाशी आणि त्यांचा तांडेल अशा सहाजणांना अतिरेक्यांनी ताब्यात घेतलं. गुजरातचे जे सागरी मच्छिमार आहेत ते सातत्याने 5-6 नॉटिकल माईल्सच्या अंतराने गुजरातची सागरी हद्द ओलांडतात. या मच्छिमारांचं पाक दहशतवाद्यांनी अपहरण केलं. या पाक दहशतवाद्यांना पाकिस्तानी कोस्टल एरियात आणलं गेलं. या दहशतवाद्यांना पाक कोस्टलमध्ये आणण्यात पाक नौदलाचा हात असण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय पाकिस्तानी दहशवादी कोस्टल एरियात शिरणार तरी कसे? या 5 जणांना ताब्यात घेतल्यांनंतर त्यांनी अल् – कुबेर हे जहाज भारतीय सरहद्दीत आणून ठेवलं. मुंबई किना-याजवळ ससून डॉगच्या आसपास हे जहाज आणलं गेलं. या अल – कुबेर जाहाजातून हे आतंकवादी मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ साधारणपणे संध्याकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान येऊन नंतरचं थरारनाट्य सुरू असल्याचा तपास यंत्रणेचा अंदाज आहे. ते थरारनाट्य आपल्याकडे 9 वाजून 20 मिनिटांनी आपल्या समोर आलं. या दहशतवाद्यांनी त्यांच्या थरारनाट्यात अत्याधुनिक अशी यंत्रणा वापरली होती. त्यांच्याजवळ जी.पी.आर.एस . सॅटेलाईट फोन सारखी सारखी साधनं सापडली आहेत. भारतीय कोस्ट गाडला हे ' अल् – कुबेर ' जहाज 5 नॉटिकल्स माईल्सवर सापडलं आहे. या जहाजावर जे खलाशी होते त्यांना आधीच मारण्यात येऊन त्यांना समुद्रात फेकण्यात आलं. पण या जाहाजाचा जो तांडेल आहे त्याची मदत घेऊन हे दहशतवादी मुंबईच्या सागरी सरहद्दीपर्यंत आले. बुधवारी रात्री 8.00 वाजता त्या तांडेलाची हत्त्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी या तांडेलाची अत्यंत निर्घृण पद्धतीने गळा चिरून हत्या केली. गळा चिरण्याआधी त्या आतंकवाद्याचे डोळे बांधण्यात आले होते. या सगळ्याता आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दहशतवाद्यांचं मनोबल. ते किती पुढे गेलं आहे, याची कल्पना या प्रवासातून स्पष्ट होते. दहशतवादी कारवाया करून मुंबईतून त्यांचा जो माघारी जाण्याचा ट्रॅक होता, तोही त्यांना जीपीआरएसमध्ये बनवून ठेवला होता. हे कारस्थान करून जर त्यांना माघारी पाकिस्तानात पळता आलं तर याच जहाजाचा वापर करून त्यांना पळायचं होतं. या सगळ्या वृत्तांतावरून हे दहशतवादी किती थंड रक्ताचे आणि बिन काळजाचे असावेत याचा अंदाज येतो. या अतिरेक्यांनी अशाप्रकारे सागरी मार्गाने शस्त्रास्त्र आणि स्फोटकं आणलीत. नि दहशतवादाचा कट त्यांनी त्यांच्या दृष्टीने यशस्वी केला. या दहशतवाद्यांना स्फोट घडव्न आणण्यासाठी मुंबईतून, भारतातून आणि इतर ठिकाणाहून मदत मिळालेली आहे. हा केवळ त्यांचा सागरी मार्गाने आलेला गटआहे. त्यांच्यापैकी काही दहशतवादी सागरी मार्गाने आलेले असतील. काही दहशतवादी घातपाती कारवाई करणा-यांच्या स्थानिक गटांतून आले असतील. या दहशतवाद्यांनी ताज आणि हॉटेल ट्रायडण्टमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या आहेत. म्हणजे याचाच अर्थ यांना दोन्ही हॉटेल्सचा चप्पा चप्पा माहीत असणार. तपास यंत्रणेला असंही आढळून आलं आहे की यातले काही दहशतवादी हॉटेल ताजमध्ये राहिले होते. काही नोकरीही करत होते.

close