मीरा भाईंदर पालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या कॅटलीन परेरा

August 28, 2012 10:33 AM0 commentsViews: 9

28 ऑगस्ट

मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅटलीन परेरा या निवडून आल्या आहेत. शिवसेना भाजप युतीच्या प्रभाकर म्हात्रे यांचा पराभव झाला. परेरा यांना 50 मतं मिळाली आहेत. बहुमतासाठी 47 मतांची आवश्यकता होती. तर उपमहापौरपदी मुजफ्फर हुसेन यांच्या आई नूरजहाँ हुसेन या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निवडणुकीत एकत्र लढले नसले तरी आता ते एकत्र येत आघाडीचा धर्म पाळला. शिवसेना आणि भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. पण या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या बहुजन विकास आघाडी, मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.

close